Exportable Vegetables: No. 1 निर्यातक्षम भाजीपाला लागवड

Exportable Vegetables: पारंपरिक शेतीतील तोटा सहन करण्यापेक्षा शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांच्या मानकांचा योग्य वापर तसेच निर्यातीसाठी लागणाऱ्या सर्व बाबी अंमलात आणून भाजीपाला पिकवला तर निर्यातीसाठी खूप मोठा वाव आहे. याचमुळे आज आपण निर्यातक्षम भाजीपाला लागवड (Exportable Vegetables) या बद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत, खालील माहिती सविस्तर वाचून घ्या..

Exportable Vegetables: निर्यातक्षम भाजीपाला लागवड

डॉ. ए. एम. सोनकांबळे, डॉ. सोनाली वानखडे, भाजीपाला शास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला कृषिप्रधान देश असलेल्या भारतात भाजीपाला मोठ्या प्रमाणात उत्पादित होतो. आपल्या देशातील योग्य हवामान, जमीन, त्यातील विविधता, भरपूर सूर्यप्रकाश, पाणी आणि इतर अनुषंगीक घटकांची उपलब्धता यामुळे आपण अनेक प्रकारच्या चांगल्या भाज्या वर्षभर पिकवू शकतो. पारंपरिक शेतीतील तोटा सहन करण्यापेक्षा शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांच्या मानकांचा योग्य वापर तसेच निर्यातीसाठी लागणाऱ्या सर्व बाबी अंमलात आणून भाजीपाला पिकवला तर निर्यातीसाठी खूप मोठा वाव आहे.

Exportable Vegetables
Exportable Vegetables

भाजीपाला निर्यात करताना त्याचा दर्जा, आधुनिक पॅकिंग, शीत साखळी, फवारलेल्या औषधांच्या घटक अवशेषाचे प्रमाण या घटकांकडे प्राधान्याने लक्ष देण्याची आवश्यकता असते. निर्यातक्षम भाजीपाल्याचे उत्पादन करण्यासाठी लागवडीपासून ते काढणीपर्यंत योग्यप्रकारे काळजी घेणे, कमीत कमी प्रमाणात कीटकनाशकाचा वापर करणे, कीड-रोग अवशेष मुक्त उत्पादन घेणे किंवा कीटकनाशक / बुरशीनाशकाचे प्रमाण कमीत कमी असणे आणि त्याचप्रमाणे ज्या कीटकनाशकावर / बुरशीनाशकावर भाजीपाला पिकामध्ये वापरण्यास बंदी आहे अशा औषधाचा वापर न करणे आदी प्रकारची काळजी घेणे आवश्यक आहे.

निर्यातीसाठी भाजीपाला (Exportable Vegetables) पिकांचे गुणवत्ता मानांक :

ताज्या भाज्या आणि त्यापासून प्रक्रिया केलेल्या पदार्थाच्या निर्यातीस निर्यातीसाठी असणारी बाजारपेठ ही फार मोठी असून आज होत असलेल्या निर्यातीच्या पाचपट निर्यात करण्यास वाव आहे, निर्यात होणाऱ्या भाज्यांमध्ये बटाटा, लसूण, कांदा, काकडी, हिरवी मिरची, मुळा, भोपळा, कारले, भेंडी, कोबी व फ्लॉवर यांचा समावेश होतो. भाज्या आयात करणाऱ्या देशांमध्ये युरोपातील देश, सौदी अरेबिया, कुवेत, इराक आणि आखाती देशांचा समावेश होतो.

भाजीपाला निर्यातीसाठी वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मापदंड आहेत. त्यानुसार कोणत्या देशाला आपण भाजीपाला निर्यात करणार आहे यानुसार प्रत्येक भाजीपाला पिकांच्या वाणांची तसेच मापदंडाची निवड करावी.

Quality standards of vegetable crops for export:

 1. भेंडी : फळे नाजूक व रंग हिरवा, कोवळी लुसलुशीत ६ ते ७ सें.मी. लांब साठवणीस योग्य, एकसारख्या आकाराची, डागविरहित, कोणत्याही प्रकारची इजा झालेली नसावी.
 2. मिरची : गर्द हिरव्या रंगाची, तिखट, साठवणीस योग्य, फळाचा आकार एकसारखा असावा. मिरची ६ ते ७ सें.मी. लांब असावी.
 3. कारले : रंग हिरवा, २५ ते ३० सें.मी. लांबीची असावी. मान बारीक असावी. हिरवी काटेरी असल्यास अधिक चांगले.
 4. गवार : हिरव्या रंगाची ७ ते १० सें.मी. लांब असावी आणि कोवळी लुसलुशीत असावी. बी धरलेली असू नये.
 5. दुधी भोपळा : २५ ते ३० सें.मी. लांबीचा दंड गोलाकार, आकाराचा आणि फिकट हिरव्या रंगाचा असावा.
 6. टोमॅटो : गोल, मध्यम आकाराचे अगर अंडाकृती असावे. रंगाने लालसर, पूर्ण पिकण्याच्या अगोदरची अवस्था, तसेच वरची साल सुरकुतलेली नसावी तर तजेलदार आकर्षक असावी. टोमॅटोचे फळ विरहित असावे.
 7. कांदा : दोन प्रकारचा निर्यात करू शकतो. एक मोठा कांदा आणि लहान कांदा. मोठ्या कांद्याचा आकार ४ ते ६ सें.मी. असावा. गडद ते फिकट लाल रंग, गोलाकार, तिखट आणि अगदी लहान कांद्यास म्हणजे २ ते ३ सें.मी. आकार लाल रंगाच्या गोलाकार कांद्यास खूप देशांतून मागणी आहे.
 8. लसूण : गोलाकार, पांढऱ्या रंगाचा ५ सें.मी. व्यासापेक्षा मोठा आकार, मोठी पाकळी, एका गड्ड्यात १० ते १५ पाकळ्या असाव्यात.
 9. बटाटा : ४.५ ते ६.० सें.मी. आकाराचा पांढरट अंडाकृती असावा. वरची साल आकर्षक असावी.
 10. शेवगा शेंगा : ५० ते ६० सें.मी. लांबीच्या व गरयुक्त असाव्यात तरोच एकसारख्या जाडीच्या आणि लांबीच्या असाव्यात.
 11. कलिंगड : २ ते ३ किलो वजनाची असावीत. आतला गर लाल असावा. कलिंगड कमी बियांचे असावे.

निर्यातक्षम भाजीपाला लागवड तंत्रज्ञान :

निर्यातक्षम भाजीपाला पिकाची लागवड करताना शेतकऱ्यांनी जमिनीच्या आरोग्यापासून ते पिकांचे आरोग्य या गोष्टींकडे लक्ष देऊन भाजीपाला उत्पादन करणे आवश्यक आहे. यामध्ये कीड व रोगाला प्रतिकारक्षम जातीची निवड करणे, पिकावरील किडी व रोगाचे नियंत्रण करण्याकरीता शिफारस केलेल्या औषधांचाच (कीटकनाशके/बुरशीनाशके) वापर करून उत्कृष्ट दर्जाच्या मालाचे उत्पादन करून त्यास आवश्यक असणारे प्रमाणीकरण करून निर्यात करणे आवश्यक आहे.

Nirgam Utara PDF Download

लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा? | Lek Ladki Yojana 2023 Online Apply

Leave a Comment