PCOD- PCOS While Breastfeeding: PCOD या आजाराबद्दल अनेक समज- गैरसमज आहेत. त्यामुळेच याविषयी तज्ज्ञांनी सांगितलेली ही माहिती विशेष उपयुक्त ठरते.
पीसीओडीचा त्रास (PCOD) असणाऱ्या तरुणींची, महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. बदललेली जीवनशैली, आहारात झालेला बदल, व्यायामाचा अभाव, जागरणं यामुळे शरीरात हार्मोन्सचे संतुलन बिघडते आणि त्यातून या आजाराला निमंत्रण मिळते. या आजाराबद्दल अनेक समज- गैरसमज आहेत. पहिलं मुल झालं की हा त्रास कमी होतो का, किंवा मग बाळ अंगावर पीत असतानाही (breastfeeding) पीसीओडीचा त्रास होतो का, असे काही प्रश्न हा त्रास असणाऱ्या मैत्रिणींना नेहमीच पडतात. म्हणूनच याविषयी तज्ज्ञ काय सांगत आहेत, हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं ठरतं.
What is the reason of PCOD?
PCOD (Polycystic Ovarian Disease) is mostly caused by a combination of hormonal imbalance and genetic tendencies. In a standard menstrual cycle, the two ovaries will alternately release mature, ready-to-be-fertilized eggs each month.
बाळ अंगावर पीत असतानाही PCOD चा त्रास होतो का?
PCOD (Polycystic Ovarian Disease) चा त्रास हा बाळंतपणानंतर विशेषतः बाळ अंगावर पित असताना देखील संभवतो. यामागचे सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे PCOD मध्ये होणारं हॉर्मोन्सचं असंतुलन.
किशोर अवस्थेत असल्यापासून काही जणींना PCOD चा त्रास असतो. त्यामुळे मग शरीरात इस्ट्रोजीन हार्मोनची कमतरता दिसून येते. स्तनांची वाढ नीट होत नाही. बाळंतपणानंतर estrogen dominance वाढतो. त्याचवेळी prolactin हे दूध बनण्यासाठी कारणीभूत असलेले हॉर्मोन कमी प्रमाणात तयार होते याशिवाय इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो.
या तीन प्रमुख कारणांमुळे मग बाळ अंगावर पीत असतानाही PCOD चा त्रास होतो. पाळी लवकर न येणे, आल्यास नियामित नसणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दूध कमी प्रमाणात तयार होणे.
ही त्याची काही प्रमुख लक्षणे आहेत . त्यावर उपचार म्हणून पौष्टिक आहार, व्यायाम व्यवस्थित असणे तर गरजेचेच आहे. पण गरज पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने हार्मोनल ट्रिटमेंट घेणेही आवश्यक ठरते.
डॉ. ऋचा दाशरथी आचार्य (स्त्रीरोग तज्ज्ञ)
पीसीओडीची लक्षणे (Symptoms Of PCOD In Marathi)
- पीसीओडीची समस्या समजून घेण्यासाठी त्याआधी तुम्हाला त्याची काही लक्षणे माहीत असणं गरजेचं आहे.
- ज्यामुळे तुम्हाला या समस्येवर पटकन उपचार करता येतात.
अचानक वजन वाढू लागणे (Weight Gain)
- पीसीओडीची समस्या असल्यास महिलांच्या वजनामध्ये अचानक वाढ होऊ लागते.
- अशा महिलांच्या पोटाचा घेर नेहमीपेक्षा जास्त दिसू लागतो.
- आजकाल अनेक महिलांमध्ये ही समस्या दिसून येत आहे.
- त्यामुळे तुमचे वजन अचानक वाढू लागले असेल तर त्याकडे दूर्लक्ष करू नका.
अनियमित मासिक पाळी (Irregular Menstrual Cycle)
- दर महिन्याला स्रीयांच्या गर्भाशयातून एक परिपक्व झालेले स्त्रीबीज बाहेर पडते. यालाच मासिक पाळी अथवा ऋतूस्त्राव असे म्हणतो.
- मात्र पीसीओडीमुळे स्त्रीबीज निर्माण होण्यास अडथळा येतो. सहाजिकच त्यामुळे मासिक पाळीची समस्या निर्माण होते. मासिक पाळी उशीरा येणे अथवा मासिक पाळीत अपुरा रक्तस्त्राव होत असेल तर याबाबत वेळीच तज्ञांचा सल्ला घ्या.
मासिकपाळी सुरू असताना असह्य वेदना होणे (Painful Menstruation)
- पीसीओडीमुळे स्त्रीयांच्या अंडाशयात गाठी निर्माण होतात. ज्यामुळे मासिक पाळीच्या काळात त्यांना असह्य वेदना जाणवू लागतात.
- मासिक पाळीच्या काळात नेहमीपेक्षा तीव्र वेदना जाणवत असतील तर त्याबाबत तुमच्या गायनेकॉलॉजिस्टचा सल्ला अवश्य घ्या.
- पीसीओडीच्या समस्येमुळे अनेकींना मासिक पाळी सुरू नसतानादेखील कोणत्याही कारणाशिवाय पोटात वेदना जाणवतात.
- काहीजणींना पीसीओडीच्या समस्येमुळे योनीमार्गामध्ये मासिक पाळी सुरू नसतानाही असह्य वेदना जाणवतात.
डोकेदुखी (Headache)
- शरीरात होणाऱ्या हॉर्मोनल बदलांचा परिणाम तुमच्या शरीरातील इतर अवयवांवरदेखील होतो.
- पीसीओडीची समस्या असल्यास काहीजणींना अचानक तीव्र डोकेदुखीला सामोरं जावं लागतं.
वंधत्व (Infertility)
- पीसीओडी हे महिलांमधील वंधत्वाचे एक प्रमुख कारण आहे.
- गर्भधारणा राहण्यासाठी ओव्हूलेशन होण्याची गरज असते.
- मात्र ओव्हूलेशनच्या कार्यात अंडाशयातील गाठींमुळे अडथळा निर्माण होतो.
- ज्यामुळे महिलांचे आई होण्याचे स्वप्न भंगू शकते.
अशक्तपणा (Weakness)
- पीसीओडीचा स्त्रीयांच्या संपूर्ण आरोग्यावर विपरित परिणाम होतो.
- हॉर्मोन्सच्या कार्यात अडथळा आल्यामुळे महिलांना हॉर्मोनल असंतूलनाला सामोरे जावे लागते.
- ज्यामुळे त्यांना सतत कंटाळवाणं आणि थकल्यासारखं वाटू लागतं.
केस गळणे (Hair Loss)
- हॉर्मोन्सचे संतुलन बिघडल्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या केसांवरही होतो.
- केसांचे योग्य पोषण न झाल्यामुळे ते कोरडे आणि निस्तेज दिसू लागतात.
- शिवाय या काळात केस मोठ्या प्रमाणावर गळतात. हॉर्मोन्स असंतुलनामुळे तुमचे केस गळत असल्यामुळे यावर बाह्य उपचार करण्यापेक्षा पीसीओडीवरील उपचार करणे गरजेचे आहे.
- यासाठी केस मोठ्या प्रमाणावर गळत असतीत तर तुमची संपूर्ण वैद्यकीय चाचणी अवश्य करून घ्या.
चेहऱ्यावर डाग आणि पिंपल्स (Pimples)
- जर तुमचे आरोग्य निरोगी असेल तर तुमचा चेहरा प्रसन्न आणि चमकदार दिसतो. मात्र पीसीओडीमुळे तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स आणि काळे डाग दिसू लागतात.
- अनेक महिला पिंपल्स आणि काळे डाग घालविण्यासाठी पार्लरमध्ये उपचार घेतात.
- मात्र या समस्येचं मुळे तुमच्या शारीरिक समस्येमध्ये दडलेले असते. त्यामुळे अशी लक्षणे आढळल्यास वेळीच वैद्यकीय उपचार घ्या.
चेहऱ्यावर केस येणे (Facial Hair)
- पीसीओडीमुळे हॉर्मोन्सचे कार्य बिघडते. हॉर्मोन्सच्या बदलाचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसू लागतो. अशा महिलांच्या चेहऱ्यावर राट केस दिसू लागतात.
- ज्यांना मॅनेज करणं अक्षरशः कठीण जातं. हे काढून टाकले तरी पुन्हा पुन्हा चेहऱ्यावर उगवत राहतात.
- ज्यामुळे तुमचा चेहरा विद्रूप दिसू लागतो.
- या समस्येवर कोणतेही सौंदर्य उपचार करून फायदा होत नाही. जीवनशैलीत बदल करून तुम्ही ही समस्या नक्कीच नियंत्रणात आणू शकता.
पीसीओडी समस्येची कारणे (Causes Of PCOD)
- पीसीओडीची लक्षणे समजून घेतल्यावर पीसीओडी या समस्येमागची कारणे जाणून घ्यावीत ज्यामुळे भविष्यात ही समस्या टाळता येऊ शकते.
चुकीची जीवनशैली (Unhealthy Lifestyle)
- आजकाल जीवनशैली वेगाने बदलत आहे. कामाचा ताण – तणाव, कौटुंबिक समस्या, दैनंदिन जीवनात येणारी आव्हानं यामुळे तुमच्या हॉर्मोन्समध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
- यामुळे तुम्हाला पीसीओडी या समस्येला सामोरं जावं लागू शकतं
चुकीचा आहार (Poor Diet)
- कामाच्या गडबडीमध्ये महिला स्वतःच्या आहारकडे पुरेसं लक्ष देत नाहीत.
- सतत जंक फूड आणि पॅक्ड फूड खाण्याचा देखील शरीरावर चुकीचा परिणाम होत असतो.
- ज्यामुळे तुमच्या हॉर्मोन्सच्या निर्मितीमध्ये बदल होतो आणि पीसीओडी सारख्या आरोग्य समस्या निर्माण होतात.
अनुवंशिकता (Heredity)
- जर तुमच्या आई अथवा बहिणीला पीसीओडीची समस्या असेल तर तुम्हालाही पीसीओडीची समस्या निर्माण होऊ शकते. पीसीओडी ही एक अनुवंशिक समस्या आहे.
व्यायामाची कमतरता (Lack Of Exercise)
- आजकालच्या बैठ्या जीवनशैलीमुळे नियमित व्यायामाची शरीराला फार आवशक्ता असते.
- मात्र जर तुम्ही व्यायाम करत नसाल तर तुम्हाला पीसीओडीचा सामना करावा लागू शकतो.
पीसीओडी समस्येसाठी कोणती वैद्यकीय चाचणी करावी (Medical Tests For Pcod)
- सोनोग्राफी – पीसीओडी तपासणीसाठी सोनोग्राफी केली जाते. पोटाच्या कोणत्याही समस्येसाठी करण्यात येणारी प्राथमिक वैद्यकीय चाचणी आहे.
- सोनोग्राफीमधून डॉक्टरांना तुमच्या स्त्रीबीजाची वाढ समजू शकते.
- जर पीसीओडीची समस्या असेल तर त्याचा परिणाम तुमच्या स्त्रीबीजाच्या वाढीवरदेखील होते.
- त्यामुळे पीसीओडीची तपासणी करताना डॉक्टर सर्वात आधी रुग्णाची सोनोग्राफी करतात.
हॉर्मोन्स टेस्ट –
- हॉर्मोन्स टेस्ट करून तुम्हाला पीसीओडीची समस्या आहे का हे समजू शकते.
- यासाठी फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन्स (Follicle Stimulating Hormone), ल्युटेनायझिंग हॉर्मोन्स (Luteinizing hormone), टेस्टॉस्टेरॉन (Testosterone) अशा काही हॉर्मोन्स टेस्ट डॉक्टर करण्याचा सल्ला देतात.
- पीसीओडीपासून दूर राहण्यासाठी करा जीवनशैलीत काही आवश्यक
पीसीओडी समस्या असल्यास गर्भधारणेवर काय परिणाम होतो? (Effect Of PCOD On Pregnancy)
- पीसीओडी समस्या असलेल्या महिलेला गर्भधारणा होणे कठीण असू शकते. कारण पीसीओडी या समस्येमुळे स्त्रीच्या हॉर्मोन्सच्या कार्यात अडथळा येतो.
- जे हॉर्मोन्स स्त्रीमध्ये गर्भधारणेसाठी स्त्रीबीज निर्माण करणे व गर्भाशयाला तयार करण्याचे काम करीत असतात.
- शिवाय हॉर्मोनच्या अति वाढीमुळे व इन्सूलीनच्या पातळीत देखील झालेल्या अती वाढीमुळे स्त्रीच्या मासिक पाळीवर परिणाम होतो ज्यामुळे ओव्हूलेशन (अंडाशयामधून स्त्रीबीज सोडले जाणे) व्यवस्थित होत नाही.
पीसीओडी समस्या असल्यास गर्भधारणा होण्यासाठी कोणते उपचार करावेत ? (Treatment For Pcod In Pregnancy)
- पीसीओडीची समस्या असल्यास वाढलेले वजन आणि अनियमित मासिक पाळीमुळे तुम्हाला गर्भधारणा होण्यासाठी समस्या निर्माण होतात.
- यासाठी गर्भधारणेसाठी प्रयत्न करण्यापूर्वीच पीसीओडीवर उपचार करणे गरजेचे आहे.
- वजन कमी करून आणि ओव्हूलेशनला चालना देणारे उपचार करून तुम्ही गरोदर राहू शकता.
- अशा उपचारांमध्ये डॉक्टर तुम्हाला काही औषधे आणि अल्ट्रा साऊंड परिक्षणाद्वारे ओव्हूलेशन कधी होणार याचा अंदाज देतात.
- या काळात सेक्स केल्यामुळे तुम्हाला गर्भधारणा होणे शक्य असते.
- फर्टिलिटी प्रोग्रेसवर लक्ष ठेवून तुम्ही तुमच्या वंधत्वावर मात करू शकता.
- शिवाय जर तुम्ही पस्तिशीच्या पुढील वयाच्या असाल तर आयु. आय आणि आय. व्हि. एफ उपचार घेऊन तुम्ही नक्कीच आई होऊ शकता.
पीसीओडी समस्या ही आपल्या बदलेल्या जीवनशैलीमुळे निर्माण झालेली समस्या आहे. त्यामुळे वेळीच योग्य उपचार करून आणि पोषक आहार आणि नियमित व्यायाम करून तुम्ही तुमच्या या समस्येवर उपचार करू शकता.