Jitada Fish : जिताडा नावाचा मासा कसा असतो व कुठे मिळतो? खाण्यासंबंधीचे फायदे काय आहेत?

Jitada Fish in Marathi: जिताडा (jitada) हा सर्वाधिक चविष्ट मासा आहे. तसेच मासा गोदावरी, महानंदा, कृष्णा, गंगा यांसारख्या नद्यांच्या खोऱ्यात आढळून येतो. बंगाली भागात तसेच बंगाली भाषेत या माशाला भेक्ती (Bhekti) या नावाने सुद्धा ओळखले जाते.

Jitada Fish: लेट्स कॅलकेरिफर (Lates calcarifer), ज्याला सामान्यतः आशियाई सागरी बास किंवा जायंट पर्च (sea bass or giant perch) म्हणून ओळखले जाते, ऑस्ट्रेलियामध्ये बारामुंडी (barramundi) म्हणून ओळखले जाते आणि याला आपल्या देशात अनेक स्थानिक नावे मिळाली आहेत जसे की केरळमधील कलांची, तामिळनाडूमधील कोडुवई इत्यादी. हा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा खाद्य मासा आहे. इंडो-पॅसिफिक देश आणि हा आपल्या देशात संवर्धन केलेला उच्च मूल्य असलेला मासा आहे. हे सेंट्रोपोमिडी (Centropomidae) कुटुंबातील आहे

 • Jitada Fish in Marathi मराठी नाव : जिताडा मासा
 • Jitada Fish inEnglish Name : Sea Bass
 • बंगाली भाषेत : भेक्ती मासा
 • ऑस्ट्रेलिया मध्ये – बारामुंडी मासा

ज्या लोकांची शेती ही खाडीलगत (salt water) असते. अशाच शेतात तळे खोदून जिताडा माशांची पैदास करण्यात येते असते. नैसर्गिकरित्या गोड्या पाण्यात आढळणारा हा मासा प्रजननासाठी खाडीलगतच्या पट्ट्यात किंवा समुद्रालगतच्या भागात स्थलांतर करतो.

Jitada Fish in Marathi : जिताडा मासा मराठी

 • या माशाचे (Jitada Fish) शरीर लांबट असून, डोक्यावर छोटासा खड्डा असतो. कल्ल्याच्या पुढील भागात एक छोटासा काटा असतो. जिताडा मासा आपल्या आयुष्यातील सुरुवातीची २ ते ३ वर्षे ही गोड्या पाण्यात घालवतो.
 • प्रजननक्षम नर आणि मादी प्रजननासाठी किनाऱ्यालगत स्थलांतर करतात. तेथेच अंडी घालतात.
 • जिताडा माशाचा रंग ( Jitada Fish Colour) करडा ते हिरवा असून, पाठीवरील भाग काळसर तर पोटाकडील भाग हा चंदेरी रंगाचा असतो. प्रजजनाच्या काळात या माशाच्या शरीरावर जांभळ्या रंगाच्या छटा दिसतात.
 • पिल्ले याच खाडीपट्ट्यात लहानाची मोठी होतात. प्रजननक्षम माशांची लांबी ४५ ते ६१ सेंटीमीटर असते. स्टॉकिंगसाठी ८ ते १० सेंटीमीटर लांबीची १० ग्रॅम वजनाचे मत्स्यबीज वापरले जाते.
 • जिताडा हा प्राणीभक्षक मासा आहे. छोटे प्राणी, कवचधारी मासे हे जिताडाचे प्रमुख अन्न आहे. सुरुवातीच्या अवस्थेत जिताडा नराचे गुणधर्म दाखवितो. कालातंराने त्याचे मादीमध्ये रुपांतर होते.
 • मादीचा आकार नरापेक्षा मोठा असतो.
 • जिताडा मासा दोन वर्षात तीन किलोपर्यंत वाढू शकतो. किंवा त्यापेक्षा मोठा होतो. जीताडाचे अधिकाधिक उत्पादन हे जून ते ऑक्टोबर या कालावधीत होते.

महाराष्ट्रात या ठिकाणी केला जातो जिताडा माशाचा व्यवसाय

जंगलामध्ये जसे वाघाला राजा म्हटले जाते तसे पाण्यामध्ये जिताडा माश्याला अनेक लोकांच्या मते राजा म्हटले जाते. महारष्ट्रातील रायगड जिल्ह्यामध्ये या माश्याचा मोठ्या प्रमाणात अनेकजण व्यवसाय करतात आणि चांगले पैसे देखील कमवत आहेत.

जिताडा माशाला जिवंत पकडणे खूप अवघड आहे असे बोलले जाते कारण हा मासा खूप चपळ असून त्याचे कल्ले धारधार असून आपल्याला इजा होण्याची देखील शक्यता असते. त्याचबरोबर याला पकडताना हा मासा जाळी देखील फाडू शकतो. याला अत्यंत ताकतवर मासा म्हंटले जाते.

जिताडा मासा खाऱ्या पाण्यामध्ये आणि गोड्या पाण्यामध्ये आढळून येत असते . परंतु जास्तीत जास्त हा मासा खाऱ्या पाण्यामध्ये जास्त काळ राहणीमान करत असतो. छोट्या माशाचे पिल्लू खरेदी करायचे असेल तर त्यासाठी 100 ते 150 रुपये मोजावे लागतात. त्यामुळे हा मासा मोठा झाल्यावर त्याची किंमत देखील जास्त असते. हा मासा जर खाऱ्या पाण्यामधील असेल तर खाण्यासाठी त्याची चव देखील चांगली लागते असे बोलले जाते.

Jitada Fish Price

जिताडा माशाचे जर छोटे पिल्लू खरेदी करायचे असेल तर त्यासाठी १०० ते १५० रुपये मोजावे लागतात.

जिताडा मासा फोटो - Jitada FISH Image / Jitada Fish Image

जिताडा माशामध्ये असणाऱ्या खोपटा भेंडखळ समुद्री खाडीत लावण्यात आलेल्या प्रकारच्या मासेमारीत मत्स्यप्रेमींना हवा हवासा जिताडा मासा सापडला. भेंडखळ गावातील अरुण ठाकूर या मासेमाराला तब्बल 35 किलो वजनाचा जिताडा मासा मिळाला. करंजा गावात तब्बल 35 हजार रुपये मोजून एका व्यक्तीने हा मासा विकत ची माहिती आहे. (Famous Jitada Fish Found In Uran Raigad)

जिताड किंवा जिताडा मासा कुठे मिळतो? 

जिताड नाही म्हणत, त्याला जिताडा असे म्हणतात. तो पेण, पनवेल, अलिबागमधील सुप्रसिद्ध मासा आहे. खाडीलगत ज्या शेतकरी बांधवांची खाडीतील शेती असते. त्या शेतात तळे खोदून त्या तळ्यात या माशाची पैदास केली जाते. तो ५०० ते ७०० रुपयांपर्यंत किंमतीने विकला जातो.

जिताडा मासा खाण्यासंबंधीचे फायदे काय आहेत?

 • निद्रानाश त्रास कमी करून, झोप सुधारते.
 • अस्थमाचा त्रास कमी करते.
 • डिप्रेशन पासून दूर ठेवते.
 • मेंदूला चालना देते.
 • त्वचा आणि केसांचे आरोग्य चांगले ठेवते.
 • केसांना चमक देते. तसेच केसांचा रंग टिकवून ठेवते. आणि केसांच्या वाढीला चालना देते. केस गळती कमी होते. केस डाट होतात.
 • त्वचेला अतिनील किरणांपासून सुरक्षित ठेवते.
 • त्वचेचा पोत सुधारते. तसेच त्वचा तजेलदार ठेवते. याच्यात व्हिटामिन सी, मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे त्वचा चांगली राहते. हा मासा आपल्या त्वचेसाठी वरदान आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

Online Shopping Fraud: Amazon Flipkart सेल दरम्यान या 5 गोष्टी लक्षात ठेवा

Xiaomi Easy Finance: स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी कंपनीच देणार पैसे, भन्नाट स्कीम वाचा

3 thoughts on “Jitada Fish : जिताडा नावाचा मासा कसा असतो व कुठे मिळतो? खाण्यासंबंधीचे फायदे काय आहेत?”

Leave a Comment