Khalapur Irshalwadi Landslide : 40 हून अधिक घरं डोंगराखाली; दुर्घटनेनं थरकाप उडवला

Khalapur Irshalwadi Landslide : रायगड परिसरातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इर्शाळगडाच्या पायथ्याशी वसलेले इर्शाळवाडी हे गाव… रात्री 11.30 ते 12 च्या दरम्यान डोंगराचा कडा खाली आला आणि त्यात 30 ते 40 घरं नागरिकांसह गाडली गेली. त्यात पुरुष, महिला, लहान मुले, पाळीव प्राणी यांच्यासह सर्वच मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या सर्वांसाठी गुरुवारची सकाळ हा काळाचा घाला ठरली. जीवाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेनं रायगडसह महाराष्ट्र हादरलाय. मध्यरात्रीपासूनच बचावकार्याला सुरुवात झाली मात्र अंधार असल्याने बचावकार्य थांबवण्यात आलं होतं. आता बचावकार्य सुरू आहे. (Khalapur Irshalwadi Landslide ajit pawar)

दरम्यान, या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त करत यंदा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेत राज्यभरातील कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ, होर्डिंग, जाहिरातींवर खर्च न करता तो निधी इर्शाळवाडी गावाच्या पुनरउभारणीसाठी उपयोगात आणावा, असं आवाहन केलं आहे.

तसेच राज्यातील काही सामाजिक संस्था आणि इतर काही नागरिकांनी देखील मदतीचे आवाहन केले आहे त्यामुळे लवकरच स्थानिकांना मदत मिळेल अशी आशा आहे. अनेक जण हे गंभीर परिस्थितीत आहेत. तसेच परिसरात मोठ्या प्रमाणावर हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment