Kotval Exam: कोतवाल परीक्षेतही कॉपी : ५ जण ताब्यात नेमका मॅटर काय झाला वाचा..

Kotval Exam: जिल्ह्यातील रिक्त ६९ पदांसाठी शनिवारी आयोजित कोतवाल भरतीच्या लेखी परीक्षेत राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय व सरस्वती भवन या केंद्रावर हायटेक कॉपीचा प्रकार उघडकीस आला असून बदनापूर तालुक्यातील राजेवाडी, खडकवा डीतील सहा जणांना पोलिसांनी तपासकामी ताब्यात घेतले. यातील पाच जणांकडे कानात ब्लूटूथ, शर्टवर बटन कॅमेरा व गुप्तांगात डिव्हाइस तर एक उमेदवार परीक्षेला गैरहजर राहून मित्राला उत्तरे सांगण्यासाठी केंद्राबाहेरच थांबलेला आढळून आला. (Kotval Exam High Tech Copy in Jalana News)

जालन्यात कोतवाल परीक्षेत हायटेक कॉपी:सहा अटकेत, राष्ट्रमाता व सभु कॉलेजमध्ये प्रकार उघडकीस, 15 मिनिटांत प्रकार आला समोर

पोलिसासह इतर काही परीक्षांमध्ये कानात ब्लूटूथ डिव्हाइस वापरून कॉपी केल्याचा प्रकार यापूर्वीदेखील उघड झालेले आहे. आता चक्क कोतवाल परीक्षेत ब्लूटूथ वापरल्याचे उघड झाले आहे. चार जणांच्या कानामध्ये अतिसूक्ष्म ब्लूटूथ आढळले आहे. एका जणाला परीक्षा केंद्र परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांचा तपास सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली. यावेळी अतिरिक्त प्रभारी पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार उपस्थित होते. शहरात १९ केंद्रावर सुमारे साडेपाच हजार उमेदवारांनी परीक्षा दिली. शनिवारी दुपारी परीक्षा आयोजित करण्यात आली. यासाठी दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी पेपर केंद्रावर पाठविला. काही उमेदवार कानामध्ये ब्लूटूथ वापरत असल्याची गोपनीय माहिती प्रशासनास मिळाली होती. या आधारे राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयात तपासणी केली असता एक जणाला ताब्यात घेण्यात आले. पेपर साडेचार वाजता संपल्यानंतर सर्व उमेदवारांची पुन्हा कसून चौकशी करण्यात आली. यात पुन्हा तीनजण आढळून आले.

मदत करणारा ताब्यात

परीक्षा सुरु झाल्यानंतर एक उमेदवार केंद्रामध्ये आढळून आला. तो परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना मदत करत असल्याचा संशय आल्याने त्यालादेखील ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेला उमेदवार परीक्षेसाठी गैरहजर होता.

कोतवाल पदाच्या ६९ जागांसाठी शनिवारी परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी ५३०६ उमेदवार पात्र होते, यापैकी ४९९६ उमेदवार परीक्षेसाठी उपस्थित होते. तर ३१० उमेदवार गैरहजर होते.

निकाल पुढे ढकलण्याची शक्यता

जिल्ह्यातील कोतवालांच्या पदासाठी आज परीक्षा पार पडली. या परीक्षेदरम्यान काही उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे उघड झाल्याने परीक्षेचा निकाल लांबण्याची शक्यता आहे. दि. १३ ऑक्टोबरपर्यंत निकाल जाहीर करण्यात आला होता. मात्र उमेदवारांकडे कॉपी करण्यासाठी वापरण्यात येणारे यंत्र आढळून आल्याने निकाल पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे.

Leave a Comment