Parth Pawar: पार्थ सुप्रिया सुळेंची बारामती लोकसभा मतदारसंघात कोंडी करणार का? अजित पवारांची रणनीती काय

Parth Pawar : राज्यात 2019 पासून अनाकलनीय अशा घडामोडी घडताना दिसत आहेत.त्यातूनचं महाविकास आघाडी सरकारची स्थापना असो किंवा पुन्हा शिंदे फडणवीस सरकारचा शपथविधी असो वा आता राष्ट्रवादीत पडलेली फूट असो. त्यामुळे राज्यातील राजकारण देशात चर्चेचा विषय ठरत आहे.

यावेळी भाजपाने फक्त पक्षचं नाही तर शरद पवार यांचे घरच फोडले आहे. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. अशातच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूका देखील तोंडावर आहेत. त्यामुळे राज्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ. हा मतदारसंघ 2014 पासून चर्चेचा विषय आहे.

Parth Pawar: पार्थ सुप्रिया सुळेंची बारामती लोकसभा मतदारसंघात कोंडी करणार का?

भाजपाने गेल्या दोन टर्म याठिकाणी मोठ्या प्रमाणावर मेहनत घेतली. मात्र खासदार सुप्रिया सुळेंचा य़ा ठिकाणी पराभव करण्यात भाजपाला यश आले नाही. त्याला कारणीभूत ठरत होते ते खास करून राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार त्यांची बारामती लोकसभा मतदार संघावर मोठी पकड आहे. त्यांच्या शब्दावर राजकारण फिरते असे बोलले जाते. मात्र आता अजित पवार हे भाजपाच्या गळाला लागले आहेत त्यामुळे या मतदार संघात सुप्रिया सुळेंचा निभाव लागेल का हा प्रश्न आहे.

अशातच दबक्या आवाजात अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांना बारामती लोकसभा मतदार संघातून भाजपाने मैदानात उतरवण्याची रणनीती आखली असल्याचे बोलले जात आहे. (Parth Pawar challenge Supriya Sule in Baramati Lok Sabha constituency What is Ajit Pawar strategy)

भाजपाने जर तसा आदेश अजित पवार यांना दिला तर बारामती लोकसभा मतदार संघातून पार्थ पवार यांना नक्कीच फायदा होईल. कारण, इंदापूर विधानसेभेचे आमदार दत्ता भरणे हे अजित पवार गटात आहेत. तसेच दाैंण्ड विधानसभेचे आमदार राहूल कुल हे भाजपाचे आमदार आहेत. तसेच पुरंदरचे माजी आमदार हे शिंदे गटाचे नेते आहेत आणि बारामती विधानसभेवर स्वत:हा अजित पवारांंची पकड ही मजबूत आहे त्यामुळे सुप्रिया सुळेंचा या मतदार संघात निभाव लागने कठीण असल्याचे दिसत आहे.

बारामती लोकसभेवर भाजपाचा झेंडा लावतील का?

बारामती लोकसभेवर भाजपाचा झेंडा लावण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेले नेते ही संधी आजमावून पाहतील का? आणि् तसे झालेच तर अजित पवार घरात कश्या पध्दतीने तोंड देतील हा देखील मोठा प्रश्न आहे. राज्यात सध्या राष्ट्रवादीचे नेते आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत त्यामुळे लोकसभेला निमकी काय रणनीती असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

2019 च्या लोकसभेला मावळ मतदार संघातून पार्थ पवार यांना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा कडवा विरोध असल्याचे अनेक जाणकारांनी बोलून दाखवले आहे. तसेच त्यांना पार्थ पवार यांना हवी तशी मदत देखील शरद पवार यांनी केली नसल्याची पक्षात दबक्या आवाजात चर्चा होती. त्यामुळे असे असेल तर अजित पवार याचा बदला घेतील का हा प्रश्न आहेच. अजित पवारांसोबतचं त्यांची दोन्ही मुलं आता राजकारणात सक्रीय होताना दिसत आहेत.

Parth Pawar
Parth Pawar

भाजपासोबत अजित पवार

भाजपासोबत सरकारमध्ये गेल्यानंतर अजित पवारांच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागल्याचे दिसत होते. मात्र या सभेवेळी लक्ष वेधलं ते अजित पवार यांच्या मुलांच्या उपस्थितीने. त्यामुळे अजित पवारांनी देखील तशी रणनीती आखायला सुरवात केली आहे का? हे लोकसभा निवडणूकीवेळी पहायला मिळेल. यावर तुम्हांला काय़ वाटतं आम्हांला कमेंट करून नक्की कळवा…

सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघात विरोधात लढणार?

२०१३-१४ मध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. पण, त्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही. रिकॉर्ड चेक करुन पाहा, मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत या समाजाला आरक्षण मिळावं यासाठी या विषयावर संसदेत सर्वाधिक सूचना देणारी खासदार मी आहे, असं शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

धनगर समाजाच्या विरोधात भाजप आहे. आता त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचं म्हटलं आहे. ४० दिवसांत त्यांनी काय अभ्यास केला, काही सूचना केल्या आहेत का? लिंगायत आणि मुस्लिम समाजाबाबत तेच सुरु आहे. निवडणुका आल्या की यांची जुमलेबाजी सुरु होते. उद्धव ठाकरे म्हणतात ही भ्रष्ट जनता पार्टी आहे, पण पुढे जाऊन म्हणते की ही भ्रष्ट जुमला पार्टी आहे, अशी टीका यावेळी त्यांनी केली.

Sharad Pawar: शरद पवारांचं ‘मिशन नाशिक’ नेमकं काय, अजित पवार गटाला घाम

Rohit Pawar: आमदार रोहित पवार यांचा मोठा गौप्यस्फोट ; आता काँग्रेसचा नंबर पण…

आमच्यासाठी संसद हे मंदिर आहे. येथे आम्ही पारदर्शक चर्चा करतो. मी कायम धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संसदेत आवाज उठवला आहे. भाजप राज्यामध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ म्हणते पण संसदेत बोलताना या आरक्षणाला विरोध करते. हे रिकॉर्ड चेक केल्यास समजेल, असं सुळे म्हणाल्या.राष्ट्रवादी काँग्रेसचा जातीनिहाय आरक्षणाला पाठिंबा आहे, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Rohit Pawar on Parth Pawar : पार्थ पवारांचं काय चुकलं ? ऐका रोहित पवारांचं स्पष्ट मत | Marathi News

Leave a Comment