Suniel Shetty : टोमॅटोचे भाव अचानक गगनाला भिडले. त्याचा परिणाम आमच्या किचनवरही झाला आहे, अशी प्रतिक्रिया अभिनेता सुनील शेट्टीने दिली होती. तसेच त्यांच्या पत्नीचे स्वयंपाक घरातील बजेट कोलमडले आहे, असं म्हटलं आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी वर्ग संतापल्याचे दिसत आहे. यावरून संतप्त प्रतिक्रिया देखील उमटत आहेत. शेतकरी वर्गात नाराजीचा सुर दिसत आहे. (ravikant tupkar slams suniel shetty tomato price Sadabhau Khot)
Table of Contents
सदाभाऊ खोत काय म्हणाले?
शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी देखील सुनील शेट्टी यांच्यावर बोचरी टीका केली आहे. तसेच आता शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनीही सुनील शेट्टींवर जोरदार टीका केली आहे. टोमॅटो खाल्ला नाही तर सुनील शेट्टी मरणार नाही, अशा बोचऱ्या शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत.
तुपकरांनी काय म्हटले?
टोमॅटोचे जर भाव वाढले असतील तर सुनील शेट्टीने टोमॅटो खाऊ नये, शेट्टी काही मरणार नाही, मात्र शेतकऱ्यांची टिंगल टवाळी करू नये, अशा शब्दात तुपकरांनी अभिनेता सुनील शेट्टीला खडसावले आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते त्यावेळी त्यांचा पारा चढलेला पहायला मिळाला.
Suniel Shetty सिने कलावंत नाही बाजारू माणूस
दरम्यान, सुनील शेट्टी सिने कलावंत नाही बाजारू माणूस आहे. शेतकऱ्याची भूमिका साकारण्यासाठी कोट्यवधी रुपये घेता, मग शेतकऱ्याला चार पैसे मिळाले तर पोटात का दुखतंय?, असा संतप्त सवाल खोत यांनी केला आहे. सडक्या विचाराचा सुनील शेट्टी भिक मागायला आला तर त्याला सडके टोमॅटोच द्या, असं आवाहनही खोत यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.
15 दिवस दरवाढ राहणार
नागपूरच्या कॅाटन मार्केटमध्ये महाराष्ट्रातून येणाऱ्या टोमॅटोची आवक पूर्णपणे बंद झाली आहे. महागाईत नागपूरकरांना आंध्राप्रदेशच्या टोमॅटोचा आधार मिळत आहे. नागपूरच्या ठोक बाजारात आंध्राचे टोमॅटो 100 ते 115 रुपये किलोने मिळत आहेत. पण किरकोळ बाजारात टोमॅटोचा दर 150 ते 175 रुपये किलो आहे.
Angkor Wat Temple: तुम्हाला माहीत आहे का 8 वे आश्चर्य?
Bikaji Success Story : आठवी पास असलेल्या व्यक्तीने भुजिया विकून बनवली 1000 कोटींची कंपनी, वाचा
ठोक बाजारात 40 वर्षांत पहिल्यांदा टोमॅटोचे दर प्रति कॅरेट 2500 रुपयांवर जाणार आहेत. आणखी 15 दिवस टोमॅटोची दरवाढ कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पावसाळी पिकाचे नवे टोमॅटो बाजारात येईपर्यंत दरवाढ कायम राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.