Sharad Pawar : राज्यात शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे. त्याचबरोबर घरात देखील फूट पडली आहे. त्यामुळे जेष्ठ नेते तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. याचे पडसाद थेट पक्षावर पडताना दिसत आहे.
Table of Contents
Sharad Pawar: शरद पवारांचं ‘मिशन नाशिक’ नेमकं काय?
कार्यकर्ते देखील मोठ्या संभ्रात होते, मात्र बऱ्याच ठिकाणी कार्यकर्त्यांनी ठाम भूमिका घेत आपण कोणासोबत हा निर्णय दिलाय.त्यामुळे आता आपल्या गटाची येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीसाठी मोर्चे बांधणी सुरू आहे अशातच शरद पवार हे कामाला लागल्याचे दिसत आहे. शरद पवार हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्याची आज त्र्यंबकेश्वर तालुक्यापासून मोहीमेला सुरूवात होत आहे. (sharad pawars mission nashik)
Sharad Pawar त्र्यंबकेश्वर येथील बैठक
त्र्यंबकेश्वर येथील पदाधिकाऱ्यांची पहिली बैठकी होणार असून तालुक्याचा आढावा घेत तालुकानिहाय पदाधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात येत आहे. त्यानुसार शरद पवार यांनी नाशिक जिल्ह्यावर फोकस केल्याचे सध्या तरी दिसत आहे. नाशिक जिल्हा आणि नाशिकमधील येवला तालुका हा जेष्ठ नेते छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे छगन भुजबळ यांना हा धक्का मानला जात आहे.
Dhananjay Munde: 50 लाख रूपये द्या अन्यथा…, भुजबळांनंतर आता धनंजय मुंडेंना…
Rohit Pawar: आमदार रोहित पवार यांचा मोठा गौप्यस्फोट ; आता काँग्रेसचा नंबर पण…
आज त्र्यंबकेश्वर तालुक्यात पहिली बैठक संपन्न होणार आहे, तसेच त्यांचा ताफा हा पुढे पेठ, हरसूल, सुरगाणा ,कळवण, सटाणा, मालेगाव, चांदवड या क्रमाने इतर बैठका ही पार पाडत जाणार आहे.
शरद पवारांसोबत पदाधिकाऱ्यांची तालुका निहाय यादी तयार करण्याचे काम सध् युध्द पातळीवर सुरु आहे येत्या पंधरा दिवसात संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेऊन नवी कार्यकारणी देखील जाहीर केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. पक्षातील फुटीमुळे प्रत्येक जिल्ह्यात नव्याने पदाधिकारी नियुक्त करण्याच्या पवार यांच्या सूचना आहेत. तशी कामाला सुरवात देखील झाली आहे. तसेच यात शरद पवार हे बारकाईने लक्ष घालत असल्याचे दिसत आहे.
येवला येथील सभेनंतर शरद पवार हे पक्ष बांधणीवर भर देत आहेत. नेते, कार्यकर्ते यांची झालेली पडझड थांबविण्यासाठी तसेच नवी बांधणी करण्यासाठी शरद पवारांनी काम सुरू केले आहे. त्याची सुरुवात नाशिकपासून केल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार यांची पहिली सभा येवल्यात पार पडली.
या सभेत शरद पवार यांनी बंडखोरांना इशारा देताना, शरद पवार गटाचे पुढचे मार्गक्रमण कसे असणार आहे, याचे थेट संकेत दिले. या सभेला छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले होते.
येवला येथील सभेनंतर शरद पवार हे पक्ष बांधणीवर भर देत आहेत. नेते, कार्यकर्ते यांची झालेली पडझड थांबविण्यासाठी तसेच नवी बांधणी करण्यासाठी शरद पवारांनी काम सुरू केले आहे. त्याची सुरुवात नाशिकपासून केल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार यांची पहिली सभा येवल्यात पार पडली. या सभेत शरद पवार यांनी बंडखोरांना इशारा देताना, शरद पवार गटाचे पुढचे मार्गक्रमण कसे असणार आहे, याचे थेट संकेत दिले. या सभेला छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले होते
येवला येथील सभेनंतर शरद पवार गटासोबत मतदारसंघातील जुने जाणते लोक असल्याचे दिसून आले. याच लोकांना आता मुंबईमध्ये बोलावून त्यांच्याशी वन टू वन चर्चा केली जात आहे. नाशिक जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांच्यासोबत राहून पक्षाची पुनर्बांधणी करा, असे आवाहन शरद पवारांकडून करण्यात आले आहे.
दरम्यान कोणत्या तालुक्यातील किती पदाधिकारी आणि कार्यकर्ते अजित पवारांसोबत गेले आहेत, याचा आढावा पवार घेत आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत नाशिक जिल्ह्यात नव्या नियुक्त्या होण्याची माहितीदेखील मिळत आहे.
वन टू वन चर्चा, आज कार्यकर्त्यांची सभा
साहेबांनी सांगितल्यानुसार सोबत असलेल्यांची नावे सुचवली होती. त्यांच्याशी साहेबांनी वन टू वन चर्चा केली. त्यांना पक्षबांधणीसाठी तयारी करण्याच्या सूचना साहेबांनी दिल्या आहेत. आजपासून त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन कार्यकर्त्यांची सभा ठेवली आहे. त्यानंतर सर्व तालुक्यांमध्ये फिरणार आहे. कोणत्या तालुक्यात काय परिस्थिती आहे, याबाबत माहिती घेऊन पक्षबांधणी जोमाने करण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे.
3 thoughts on “Sharad Pawar: शरद पवारांचं ‘मिशन नाशिक’ नेमकं काय?”