Tahasildar Contract Job: हद्दच झाली… आता कंत्राटी पद्धतीने तहसीलदार पद भरणे आहे.

Tahasildar Contract Job: जिल्हाधिकारी जळगाव, सक्षम प्राधिकारी जळगाव, उप विभागीय अधिकारी भूसावळ, अमळनेर, पाचोरा, चाळीसगाव आदी भागांमध्ये सहा महिन्यांकरीता सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची विविध पदांवर पदभरती केली जाणार आहे. याची जाहिरात समाज माध्यमांवर फिरत असून यानुसार आता सहा महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने तहसीलदार पदावर भरती केली जाणार आहे. (Jalgaon Distric Collector office published advertisement regarding recruitment of Tahsildar on Contract Basis Job)

Tahasildar Contract Job

तहसीलदारासारखे महत्त्वाचे पद कंत्राटी पद्धतीने भरले जाणार असल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. ही जाहिरात जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांनी प्रकाशित केली आहे. त्यानुसार तहसीलदार, कारकून किंवा मंडळ अधिकारी या पदांवर कंत्राटी भरती केली जाणार आहे. यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाच प्राधान्य दिले जाणार आहे.

तहसीलदार पदासाठी ४० हजार रुपये मानधन तर कारकून पदासाठी २५ हजार रुपये मानधन राहणार आहे. यासाठी शैक्षणिक अर्हता आणि विविध नियम दिले आहेत. मात्र, शासनाने बाह्ययंत्रणेच्या माध्यमातून कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतल्यावर आधीच तरुणांमध्ये रोष असताना आता तहसीलदार पदच कंत्राटी भरले जाणार असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

  • लवाद (भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण) तथा जिल्हाधिकारी, जळगाव
  • सक्षम प्राधिकारी तथा उप विभागीय अधिकारी, जळगाव भाग, जळगाव
  • सक्षम प्राधिकारी तथा उप विभागीय अधिकारी, भुसावळ भाग, भुसावळ
  • सक्षम प्राधिकारी तथा उप विभागीय अधिकारी, अमळनेर भाग, अमळनेर
  • सक्षम प्राधिकारी तथा उप विभागीय अधिकारी, पाचोरा भाग, पाचोरा
  • सक्षम प्राधिकारी तथा उप विभागीय अधिकारी चाळीसगाव भाग
Tahasildar Contract Job
Tahasildar Contract Job

चाळीसगाव यांचे कार्यालयांतील पुढील पदांवर मासिक मानधन तत्वावर कामकाज करण्याकामी केवळ तात्पुरत्या स्वरुपात ६ महिन्यांचे ( प्रथम ३ महिने व आवश्यकता असल्यास त्यापुढे ३ महिने) कालावधीसाठी पुढील अटी व शर्ती बंधनकारक ठेवून पात्र सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी व उमेदवारांची नियुक्ती करावयाची आहे.

यासाठी दि. २९/०९/२०२३ रोजी सकाळी ९.४५ ते दि. १३/१०/२०२३ रोजी सायंकाळी ०६.१५ (शासकीय सुटीचे दिवस वगळून) या कालावधीत इच्छुक व पात्र सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी व उमेदवारांकडून समक्ष अथवा नोंदणीकृत डाकेद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

अ.क्र.पदनामआवश्यक संख्याप्रतिमाह मानधन
1सेवानिवृत्त तहसिलदार किंवा नायब तहसिलदार0840000 Rs/-
2सेवानिवृत्त अव्वल कारकून किंवा मंडळ अधिकारी किंवा लिपीक-टंकलेखक1525000 Rs /-
3संगणक चालक (Computer Operator)3016000 Rs /-
4शिपाई1012000 Rs /-

Tahasildar Contract Job वयोमर्यादा :- ( वयोमर्यादा गणण्याचा दिनांक :- १३/१०/२०२३ )

अ.क्र.पदनामवयोमर्यादा
1सेवानिवृत्त तहसिलदार किंवा नायब तहसिलदार६८ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
2सेवानिवृत्त अव्वल कारकून किंवा मंडळ अधिकारी किंवा लिपीक-टंकलेखक६८ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
3संगणक चालक (Computer Operator)२२ ते ४५ वर्ष
4शिपाई१८ ते ४५ वर्ष

Tahasildar Contract Job शैक्षणिक अर्हता व अनुभव

अ.क्र.पदनामशैक्षणिक अर्हता व अनुभव
1सेवानिवृत्त तहसिलदार किंवा नायब तहसिलदारसदर पदावर कमीत कमी ३ वर्ष काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक. मराठी व इंग्रजी लिहिता / वाचता येणे आवश्यक. संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण अगर सूट मिळालेली असणे आवश्यक.
2सेवानिवृत्त अव्वल कारकून किंवा मंडळ अधिकारी किंवा लिपीक-टंकलेखकसदर पदावर कमीत कमी ५ वर्ष काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक. मराठी व इंग्रजी लिहिता / वाचता येणे आवश्यक. संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण अगर सूट मिळालेली असणे आवश्यक. संगणकावर मराठी व इंग्रजी टंकलेखन करता येणे आवश्यक. (टंकलेखन अट मंडळ अधिकारी पदाला लागू नाही)
3संगणक चालक (Computer Operator)कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
संगणक अर्हता म्हणून MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. परीक्षा उत्तीर्ण असलेबाबत शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा शासनमान्य संगणक टंकलेखन प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक.
मराठी व इंग्रजी लिहिता वाचता येणे आवश्यक.
संगणकावर मराठी व इंग्रजी टंकलेखन करता येणे आवश्यक.
4शिपाईउच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (HSC / १२वी) उत्तीर्ण असणे आवश्यक.
मराठी व इंग्रजी लिहिता / वाचता येणे आवश्यक.

Tahasildar Contract Job कार्यालनीय कामकाजाची वेळ

अ.क्र.पदनामकामकाज वेळ
1सेवानिवृत्त तहसिलदार किंवा नायब तहसिलदारसोमवार ते शनिवार
सकाळी ०९.४५ ते सायंकाळी ०६.१५
2सेवानिवृत्त अव्वल कारकून किंवा मंडळ अधिकारी किंवा लिपीक-टंकलेखकसोमवार ते शनिवार
सकाळी ०९.४५ ते सायंकाळी ०६.१५
3संगणक चालक (Computer Operator)सोमवार ते शनिवार
सकाळी ०९.४५ ते सायंकाळी ०६.१५
4शिपाईसोमवार ते शनिवार
सकाळी ०९.३० ते सायंकाळी ०६.३०

टिप :- याव्यतिरिक्त कामकाजाचे महत्व / स्वरूप / तातडी व प्राथम्य पाहून वरिष्ठ अधिकारी यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त वेळ कामकाज करणे बंधनकारक राहील.

अर्जासोबत सादर करणे आवश्यक असलेले कागदपत्र :-

अ) सेवानिवृत्त तहसिलदार किंवा सेवानिवृत्त नायब तहसिलदार, सेवानिवृत्त अव्वल कारकून किंवा सेवानिवृत्त मंडळ अधिकारी किंवा सेवानिवृत्त लिपीक-टंकलेखक या पदांसाठी :-

  • विहित नमुन्यातील अर्ज व त्यावर नजीकच्या कालावधीत काढलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्र.
  • मूळ सेवापुस्तकाची प्रमाणित नक्कल प्रत / स्वसाक्षांकित छायाप्रत अथवा दुय्यम सेवापुस्तकाची स्वसाक्षांकित छायाप्रत.
  • नियुक्ती प्राधिकारी यांच्या स्वाक्षरीने निर्गमित केलेले ना विभागीय चौकशी ना देय प्रमाणपत्र (२७/४ प्रमाणपत्र) ची प्रमाणित नक्कल प्रत / स्वसाक्षांकित छायाप्रत.
  • निवृत्तीवेतन मंजूर झालेबाबत दस्तऐवजाची प्रमाणित नक्कल प्रत / स्वसाक्षांकित छायाप्रत.
  • सेवानिवृत्तीच्या दिनांकापूर्वीच्या ५ वर्षांच्या गोपनीय अहवालाच्या प्रमाणित नक्कल प्रत / स्वसाक्षांकित छायाप्रत. (उपलब्ध नसल्यास लेखी अर्ज स्वरूपात कळविणे आवश्यक राहील.)
  • संपूर्ण सेवाकालावधीत उल्लेखनीय कामकाजाबद्दल मिळालेले प्रमाणपत्राची साक्षांकित छायाप्रत / स्वसाक्षांकित छायाप्रत.
  • आधार कार्ड साक्षांकित छायाप्रत.
  • पॅन कार्ड साक्षांकित छायाप्रत.

Bikaji Success Story : आठवी पास असलेल्या व्यक्तीने भुजिया विकून बनवली 1000 कोटींची कंपनी, वाचा

Jalsampada Vibhag Bharti : तब्बल 4497 पदांची जलसंपदा विभागात मोठी भरती

Karagruh Police Bharti 2023: तब्बल २ हजार पदांसाठी कारागृह पोलीस भरती 2023

ब) संगणक चालक (Computer Operator) व शिपाई या पदांसाठी :-

  • विहित नमून्यातील अर्ज व त्यावर नजीकच्या कालावधीत काढलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्र.
  • संगणक चालक पदासाठी कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असल्याबाबत प्रमाणपत्राची साक्षांकित छायाप्रत.
  • शिपाई पदासाठी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (HSC / १२वी) उत्तीर्ण असल्याबाबतचे प्रमाणपत्राची साक्षांकित छायाप्रत.
  • संगणक चालक पदासाठी संगणक अर्हता म्हणून MSCIT परीक्षा उत्तीर्ण असल्याबाबतचे प्रमाणपत्राची साक्षांकित छायाप्रत.
  • संगणक चालक पदासाठी मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. परीक्षा उत्तीर्ण असलेबाबत शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा शासनमान्य संगणक टंकलेखन प्रमाणपत्राची साक्षांकित छायाप्रत.
Contract Recruitment Of Tehsildar| Tahasildar Contract Job| कंत्राटी पद्धतीने तहसीलदारांची भरती,जाहिरातीत नेमका कशाचा उल्लेख?

Leave a Comment